विनेशने ऑलिम्पिक जर्सी घालून भावाला बांधली राखी, भेट म्हणून दिलं ५००च्या नोटांचं बंडल
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधून परतल्यानंतर विनेश फोगटचे भारतात जोरदार स्वागत झाले. नवी दिल्ली विमानतळावर आणि बलाली गावात तिचे जंगी स्वागत झाले. सोमवारी तिने भावाला राखी बांधली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. विनेशला तिच्या भावाने भेट म्हणून ५०० च्या नोटांचं बंडल दिलं आहे, त्यांचा हा व्हीडिओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.