“कल खेल में, हम हो ना हो…”, विनोद कांबळींची रुग्णालयातून भावनिक प्रतिक्रिया!
भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे भिवंडीतील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर अतीदक्षता विभागात उपचार चालू आहेत. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. आर्थिक मदतीसाठी आवाहन करण्यात आलं असून ३० लाख रुपये जमा झाले आहेत. कांबळी यांनी लवकरच बरे होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आणि चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.