कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी चेन्नईमध्ये सराव करत आहे. सरावादरम्यान विराट कोहलीने चेपॉक स्टेडियमच्या भिंतीला फटका मारून भगदाड पाडले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराट बऱ्याच कालावधीनंतर कसोटीत पुनरागमन करणार आहे. बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकली असून, भारतात पहिली कसोटी मालिका जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.