What is Rest Day: विश्रांतीचा दिवस म्हणजे काय? १५ वर्षांनंतर कसोटीमध्ये परतणार; SL vs NZ कसोटी सामना सहा दिवस का असणार?
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेत १५ वर्षांनंतर विश्रांतीचा दिवस ठेवण्यात आला आहे. २१ सप्टेंबरला श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांमुळे हा दिवस विश्रांतीचा असेल. त्यामुळे कसोटी सामना ६ दिवसांचा असेल, पण खेळाडूंना ५ दिवसच खेळावे लागणार आहे. २००१ नंतर श्रीलंकेत पहिल्यांदाच विश्रांतीचा दिवस ठेवण्यात आला आहे. पूर्वी रविवार हा दिवस ठेवला जात असे.