“कर्म…”, भारत-इंग्लंड सामन्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी BCCI ला केलं ट्रोल, काय आहे कारण?
भारत-इंग्लंड दुसरा वनडे सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवला गेला. फ्लडलाईट्स बंद झाल्याने सामना दोनदा थांबवावा लागला, ज्यामुळे पाकिस्तानी चाहत्यांनी बीसीसीआयला ट्रोल केले. त्यांनी भारताच्या श्रीमंत क्रिकेट बोर्डावर टीका केली आणि पाकिस्तानच्या गद्दाफी स्टेडियममधील फ्लडलाईट्सवर टीका केल्याचे प्रत्युत्तर दिले.