बांगलादेशकडून पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तान WTC फायनलमध्ये पोहोचू शकतो? काय आहे समीकरण?
पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. बांगलादेशने पहिल्यांदाच कसोटीत पाकिस्तानचा १० विकेट्सने पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तान आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या शर्यतीतून बाहेर पडला का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. पाकिस्तान संघ ८व्या स्थानावर असून अजूनही अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे.