उन्हाळ्यात घरी होऊ शकतो एसीचा स्फोट! दिवसरात्र एसी चालू ठेवताय? मग करू नका या चुका
AC Blast Prevent Tips: मंगळवारी नोएडाच्या सेक्टर १८ मधील एका सहा मजली व्यावसायिक इमारतीला आग लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत काही जणांनी काचा फोडून उड्या मारल्या. या घटनेचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर या आगीमागचं कारण एसीमधील स्फोट असल्याचं म्हटलं जातंय.