केसातील कोंडा होईल दूर आणि केस गळतीही थांबेल, घरातील ‘ही’ गोष्ट एकदा वापरून बघाच
हिवाळा सुरू झाला आहे, त्यामुळे प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला केसातील कोंड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. केसात कोंडा झाला आणि त्यावर काहीही उपाय केले नाही तर यामुळे केस गळती होऊ शकते. तुम्ही जर अनेक शाम्पू, हेअर ऑईल, हेअर सिरम आणि हेअर मास्क ट्राय केले असतील आणि त्याचा परिणाम तुमच्या कोंड्यावर झाला नसेल तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही कोंड्याच्या या त्रासापासून मुक्तता मिळवू शकता.