केस गळतीच्या समस्येवर फॉलो करा अभिनेत्री करिश्मा तन्नाने सांगितले ‘हे’ ५ जबरदस्त उपाय
आजकाल अनेकजण केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत लोक केसांच्या काळजीसाठी महागडे शॅम्पू आणि विविध हेअर केअर प्रोडक्ट्स वापरतात, पण त्याने फारसा फरक पडत नाही. उलट अशा गोष्टींमुळे अधिक केस गळू लागतात. यात काहीजण केसांची योग्य काळजी घेत नाहीत. केसांना तेल न लावणे, कोंड्यावर उपचार न करणे, सकस आहार न घेणे अशा अनेक कारणांमुळे केस गळती वाढू लागते. पण तुम्ही काही नैसर्गिक घरगुती उपाय करुन केस गळती रोखू शकता.