मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा मराठीतून शुभेच्छा
हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे विशेष असे महत्त्व आहे; पण वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा मकर संक्रांत सण अधिक खास मानला जातो. या दिवशी सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो आणि त्यामुळे या सणाला मकर संक्रांत, असे म्हणतात. या सणाच्या निमित्ताने पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो, तिळगुळाचे लाडू वाटून एकमेकांना गोड शुभेच्छा दिल्या जातात. यंदा १४ जानेवारी रोजी मंकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने तुम्ही प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook च्या माध्यमातून शुभेच्छा अन् शुभेच्छापत्र पाठवू शकता.