Amla and Karvand Health Benefits in Marathi | Nutrition Facts of Amla and Karvand
1 / 30

Health Special Amla and Karvand ‘हे’ फळ जगातील सर्वाधिक रोगांवर गुणकारी आणि आरोग्यवर्धक!

आवळा कोणत्याही रोगावर, कोणाही व्यक्तीला निर्धोकपणे द्यावा. ताज्या आवळ्यापासून ते थेट आवळ्याच्या वेस्ट प्रॉडक्ट, आवळा सुपारीपर्यंत आवळा किती प्रकारे नाना प्रकारच्या विकारांवर उपयोगी पडतो हे बघितले तर जगात इतर औषधांची गरजच भासणार नाही. इतके आवळ्याचे औषधी महत्त्व आहे

Swipe up for next shorts
Donald Trump usaid fund to india
2 / 30

ट्रम्प यांचा भारताबाबतचा ‘तो’ दावा चुकीचा, २.१ कोटी डॉलर्स भारताला नव्हे, बांगलादेशला…

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला २.१ कोटी डॉलर्स निवडणूक प्रक्रियेसाठी दिल्याचा दावा केला होता. मात्र, इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हा निधी भारताला नव्हे तर बांगलादेशला देण्यात आला आहे. बांगलादेशमधील राजकीय व नागरी व्यवस्था सुधारण्यासाठी १.३४ कोटी डॉलर्स आधीच वापरले गेले आहेत. ट्रम्प यांच्या विधानामुळे भारतीय राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

Swipe up for next shorts
Chhaava kavi kalash Vinit Kumar Singh struggle story
3 / 30

डॉक्टर विनीत झाला अभिनेता, २२ वर्षांच्या संघर्षानंतर ‘छावा’तून मिळाली ‘कवी कलश’ला ओळख

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर विनीत कुमार सिंहने कवी कलशची भूमिका केली आहे. विनीतच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. 'छावा'मुळे विनीतला मोठी ओळख मिळाली. विनीत मूळचा उत्तर प्रदेशचा असून, तो डॉक्टर आणि राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल चॅम्पियन आहे.

Swipe up for next shorts
Chhaava Box Office Collection Day 7
4 / 30

Chhaava: ‘छावा’ची प्रेक्षकांमध्ये क्रेझ! चित्रपटाने एका आठवड्यात किती कमाई केली? वाचा…

विकी कौशलच्या मुख्य भूमिकेत असलेला 'छावा' चित्रपट, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर आधारित आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. पहिल्या आठवड्यात 'छावा'ने २२५.६८ कोटी रुपयांची कमाई केली. १३० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने तीन दिवसांतच बजेट वसूल केले. विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांसारखे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

narendra maharaj on mahayuti victory
5 / 30

“१० ते १२ जागा येतील याचीही अजित पवारांना खात्री नव्हती”, नरेंद्र महाराजांचं विधान चर्चेत!

गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची पीछेहाट झाली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपने १३२ जागा जिंकल्या. नरेंद्र महाराज यांनी या विजयाचं श्रेय साधू-संत आणि संघाला दिलं आहे, लाडकी बहीण योजनेला नाही. त्यांनी राजकीय नेत्यांवर टीका करत हिंदू धर्माच्या रक्षणासाठी संतांनी जनजागृती केल्याचं सांगितलं. अजित पवारांनाही विजयाची खात्री नव्हती, असंही त्यांनी म्हटलं.

health tips body is dehydrated or not with these 3 tests celebrity dietician gives suggestions
6 / 30

डिहायड्रेशन कसं ओळखायचं? अनुष्का शर्माच्या डायटिशिअनने सांगितल्या ‘या’ ३ सोप्या टिप्स

How To Check Dehydration : प्रत्येक ऋतूनुसार आपल्या शरीरात बदल होत असतात. या काळात विविध प्रकारचे आजार बळवतात. विशेषत: हिवाळ्यात सर्दी, ताप किंवा फ्लूसारख्या आजारांचे प्रमाण अधिक असते. या काळात अनेकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवते. कारण हिवाळ्यात तहान कमी लागत असल्याने पाणी पिण्याचे प्रमाण देखील कमी असते. अशाने शरीरात पाण्याची प्रमाण कमी झाल्याने डिहायड्रेशनची स्थिती निर्माण होते. पण अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात.

Which food items should not cooked in pressure cooker it affects health
7 / 30

प्रेशर कुकरमध्ये चुकूनही शिजवू नका ‘हे’ पदार्थ, शरीरासाठी ठरू शकतात धोकादायक…

प्रेशर कुकरचा वापर घरोघरी केला जातो. रोजच्या रोज भात शिजवण्यापासून ते अनेक गोष्टींसाठी प्रेशर कुकर उपयोगी पडतो. अगदी झटपट कोणती गोष्ट शिजवायची असेल, तर प्रेशर कूकर कामी येतो. पण तुम्हाला माहिती आहे का, असे काही पदार्थ आहेत जे प्रेशर कुकरमध्ये तुम्ही शिजवू नयेत. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे पदार्थ शिजवणे अधिक हानिकारक मानले जाते आणि त्यामुळे पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. चला तर मग या पदार्थांबद्दल अधिक जाणून घेऊ या…

Mahakumbh mela 2025
8 / 30

महाकुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या आणि कपडे बदलणाऱ्या महिलांच्या व्हिडिओची खरेदी-विक्री

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभमेळ्यात महिलांचे स्नान करतानाचे आणि कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढून विकले जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी १०३ सोशल मीडिया अकाऊंट्सवर कारवाई करण्यात आली आहे. महाकुंभाचे उपमहानिरीक्षक वैभव कृष्णा यांनी सांगितले की, असे व्हिडिओ विकणाऱ्यांना आणि खरेदी करणाऱ्यांना अटक केली जाईल. सोशल मीडिया टीम सतत देखरेख करत आहे.

Mohammed Shami Completes 200 Wickets in ODIs with Fewest Balls
9 / 30

मोहम्मद शमीने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड, वनडेमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला गोलंदाज

मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात ३ विकेट्स घेतल्या आणि २०० वनडे विकेट्सचा टप्पा गाठला. शमीने ५१२६ चेंडूत २०० विकेट्स घेत मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला. शमी आता सर्वात कमी चेंडूत २०० वनडे विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने १२ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली.

success story of anand betala owner of pure water technologies started business in 5000 rupees
10 / 30

लहानपणी बिस्किटे विकून भागवली पोटाची भूक, आता पडतोय पैशांचा पाऊस, वाचा काय करते ही व्यक्ती

Success story of anand betala: महाराष्ट्रात जन्मलेले आणि कर्नाटकात वाढलेले आनंद बेताला हे ‘प्युअर वॉटर टेक्नॉलॉजीज’ नावाच्या कंपनीचे संस्थापक आहेत. याद्वारे ते ८० लाखांहून अधिक लोकांना स्वच्छ पाणी पुरवत आहेत. त्यांनी फक्त पाच हजार रुपयांच्या भांडवलातून आपले काम सुरू केले. आनंद यांनी ग्रामीण आणि शहरी भागात कमी खर्चात तीन हजारांहून अधिक आरओ प्लांट बसवले आहेत. आज ते त्यांच्या या उपक्रमातून लाखो रुपये कमावतात. चला तर मग यानिमित्ताने त्यांच्या यशाच्या प्रवासाबद्दल येथे जाणून घेऊया.

Chhaava tax free in Goa after Madhya Pradesh
11 / 30

Chhava : ‘या’ दोन राज्यांमध्ये छावा टॅक्स फ्री, मुख्यमंत्री म्हणाले, “विकी कौशलने…”

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' चित्रपट जगभरात चर्चेत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट १४ फेब्रुवारीला रिलीज झाला आणि ६ दिवसांत २०० कोटींचा टप्पा पार केला. मध्य प्रदेश आणि गोव्यात 'छावा' टॅक्स फ्री करण्यात आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या चित्रपटातून संभाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास पडद्यावर आणल्याचे म्हटले. महाराष्ट्रात करमणूक कर नसल्याने टॅक्स फ्री करण्याची गरज नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Good sleep at night can help get rid of bad memories study says expert advice
12 / 30

तुम्हालाही सतत वाईट आठवणी येत राहतात? मग रात्रीची झोप यावर ठरू शकते रामबाण उपाय

Sleep can get rid of bad memories: नकारात्मक आठवणी जेव्हा आपल्या मनात येतात, तेव्हा त्या खूप त्रासदायक ठरू शकतात, ज्यामुळे आपली मानसिक स्थिती खराब होऊ शकते आणि आपली विचारशक्ती कमी होऊ शकते. २०२४ मध्ये ‘Psychological and Cognitive Sciences’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जागे असताना सकारात्मक आठवणी आठवण्यामुळे माणसांमध्ये नकारात्मक भावना आणि डिप्रेशनच्या लक्षणांमध्ये सुधारणा होऊ शकते.

dipika kakar quits celebrity masterchef says usha nadkarni
13 / 30

चार वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक करणाऱ्या ‘या’ स्पर्धकाची ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून EXIT

‘सोनी टेलिव्हिजन’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढताना दिसत आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांनी वेगवेगळे पदार्थ बनवून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून ९०च्या दशकातील बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री आयेशा झुलकाची एन्ट्री झाली. त्यानंतर अभिजीत सावंत एविक्ट झाला. आता एका स्पर्धकाने अचानक ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाला रामराम केल्याचं समोर आलं आहे. याबाबत उषा नाडकर्णी यांनी स्वतः सांगितलं आहे.

Uddhav-Thackeray
14 / 30

“मी धक्कापुरुष झालोय”, मातोश्रीवरील सभेत उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना असं का म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी कोकणातील राजन साळवी आणि इतर कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिल्यामुळे झालेल्या धक्क्यांबद्दल बोलताना, "मी आता धक्कापुरुष झालोय," असं म्हटलं. कलीना मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी जपानच्या भूकंपाच्या धक्क्यांची तुलना केली. पालिकेच्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये होण्याची शक्यता असून, सर्वांनी संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करावं, असं आवाहन केलं.

raj babbar reaction on son pratiek babbar second marriage
15 / 30

“पुरुष लग्न…”, प्रतीकच्या दुसऱ्या लग्नाबद्दल नाराज राज बब्बर यांची प्रतिक्रिया चर्चेत

बॉलीवूड अभिनेता प्रतीक बब्बरने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी दुसरं लग्न केलं. हे लग्न मुंबईत दिवंगत आई स्मिता पाटील यांच्या घरी झालं, ज्यात मोजके पाहुणे उपस्थित होते. प्रतीकने बब्बर कुटुंबातील कुणालाच निमंत्रण दिलं नव्हतं, ज्यामुळे सावत्र भाऊ आर्य बब्बर नाराज झाला. आर्यने स्टँड-अप कॉमेडी ॲक्टमध्ये वडील राज बब्बर यांच्या प्रतिक्रियेबद्दल सांगितलं, ज्यात त्यांनी प्रतीकच्या लग्नावर टीका केली.

rekha gupta delhi cm oath taking ceremony
16 / 30

Video: सून झाली दिल्लीची मुख्यमंत्री, सासूचा आनंद गगनात मावेना; म्हणाल्या, “रेखा घरही…

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रीपदाची सूत्रं सोपवली. रेखा गुप्ता यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांच्या सासू मीरा गुप्ता यांनी कौतुकाची प्रतिक्रिया दिली. शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. रेखा गुप्तांच्या मुलानेही त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे.

Shehnaaz Gill Diet Plan
17 / 30

शहनाझ गिलने सहा महिन्यात कसे केले ५५ किलो वजन कमी? वाचा तिचा संपूर्ण डाएट प्लॅन

Shehnaaz Gill Weight Loss Journey : मॉडेल, गायक व अभिनेत्री असलेली शहनाझ गिलने लॉकडाऊनदरम्यान तिचे वजन कमी केले. तिने काही मुलाखतींमध्ये तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाविषयी सांगितले आहे.

Daaku Maharaaj OTT Release
18 / 30

बॉक्स ऑफिस गाजवणारा सिनेमा अन् ते वेब सीरिज; या आठवड्यात ओटीटीवर काय पाहायचं? वाचा

फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ओटीटीवर अनेक मनोरंजक चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत. 'उप्स अब क्या' २० फेब्रुवारीला जिओ हॉटस्टारवर, 'रीचर सीजन 3' प्राइम व्हिडीओवर, 'क्राइम बीट' ZEE5 वर, 'डाकू महाराज' २१ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर आणि 'ऑफिस' तमिळ शो २१ फेब्रुवारीला हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहेत.

Marathi actress Prajakta Mali was given a marriage proposal by a farmer son
19 / 30

प्राजक्ता माळी लग्नासाठी झाली तयार, आईला मुलं शोधण्यासाठी दिली परवानगी

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात प्राजक्ता अभिनेता स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात यांच्यासह झळकणार आहे. प्रसाद खांडेकरने ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून २८ फेब्रुवारीला हा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने प्राजक्ता माळी ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. अशातच प्राजक्ताला एका शेतकरी मुलाने लग्नाची मागणी घातल्याचं समोर आलं आहे.

rekha saree photo
20 / 30

“पर्सनल आहे प्रायव्हेट…”, रेखा यांनी नेहमी साड्या नेसण्यामागचं सांगितलेलं कारण

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा या वयातही सुंदर दिसतात आणि नेहमी साडी नेसतात. साडी नेसण्यामागचं कारण त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. रेखा म्हणाल्या की साडी त्यांची परंपरा आहे आणि ती त्यांना त्यांच्या आईची आठवण करून देते. कांजीवरम साडी नेसल्यावर त्यांना प्रेम, संरक्षण आणि सॉफ्टनेस जाणवतो. तसेच, रेखा नेहमी भांगेत कुंकू लावतात, यामागेही त्यांच्या शहराची फॅशन आहे.

Mehidy Hasan Miraz On Jasprit Bumrah Sanjana Ganesan
21 / 30

‘बुमराह नसल्यामुळे आम्ही आनंदी’, संजना गणेशनसमोर बांगलादेशी फलंदाजाची कबुली

भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी बांगलादेशचा फलंदाज मेहदी हसन मिराजने जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीबद्दल आनंद व्यक्त केला. बुमराहच्या पत्नी संजना गणेशनला दिलेल्या मुलाखतीत मिराजने बुमराहच्या गोलंदाजीची प्रशंसा केली. दुखापतीमुळे बुमराह २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या जागी हर्षित राणाचा समावेश करण्यात आला आहे.

Kareena Kapoor Karisma Kapoor Ranbir Kapoor and alia bhatt dance in Aadar Jain-Alekha Advani Mehndi Ceremony
22 / 30

भावाच्या मेहंदी सोहळ्यात करीना-करिश्मा, रणबीर-आलिया पंजाबी गाण्यावर थिरकले; पाहा व्हिडीओ

Aadar Jain-Alekha Advani Wedding : आदर जैन आणि अलेखा आडवाणीच्या मेहंदी सोहळ्याला करीना कपूर बहीण करिश्मा कपूरबरोबर पोहोचली होती. तर रणबीर कपूर पत्नी आलिया भट्ट आणि सासू सोनी राजदानबरोबर पोहोचला होता. सोशल मीडियावर सध्या आदर आणि अलेखाच्या मेहंदी सोहळ्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यामधील कपूर कुटुंबाच्या जबरदस्त डान्स व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

ishita dutta vatsal sheth expecting second baby
23 / 30

लग्नानंतर ८ वर्षांनी दुसऱ्यांदा आई होणार बॉलीवूड अभिनेत्री, २ वर्षांचा आहे मुलगा

अभिनेता अजय देवगणची ऑनस्क्रीन लेक इशिता दत्ता आणि तिचा पती वत्सल शेठ दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. वत्सलने ही बातमी शेअर करताना सांगितलं की, इशिताने त्याला प्रेग्नेंसीबद्दल सांगितल्यावर तो खूप खूश झाला. इशिता आणि वत्सल यांना एक मुलगा आहे, वायू, ज्याचा जन्म २०२३ मध्ये झाला होता. आता ते दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.

devendra fadnavis in agra
24 / 30

“…तर मी देवेंद्र फडणवीस नाव सांगणार नाही”, मुख्यमंत्र्यांचा निर्धार; “आईशप्पथ सांगतो..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आग्रा येथे आयोजित कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांनी शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेचा इतिहास सांगितला आणि आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक बांधण्याची विनंती केली. फडणवीसांनी उत्तर प्रदेश सरकारला मीना बझार येथील मुघल म्युझियम शिवाजी म्युझियममध्ये रुपांतरित करण्याची मागणी केली. त्यांनी आश्वासन दिलं की हे स्मारक ताज महालापेक्षा अधिक पर्यटकांना आकर्षित करेल.

alia bhatt brother in law aadar jain mehendi look viral watch video
25 / 30

Video: दिराच्या मेहंदी सोहळ्यात आलिया भट्टचा हटके लूक, हेअरस्टाइलने वेधलं सगळ्यांचं लक्ष

बॉलीवूड February 20, 2025

बॉलीवूडच्या कपूर कुटुंबात सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे. करीना-करिश्मा, रणबीर कपूरचा भाऊ आदर जैन लवकरच हिंदू रिती-रिवाजानुसार लग्नबंधनात अडकणार आहे. याआधी आदरने गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने अलेखा आडवाणीशी लग्न केलं होतं. त्यानंतर आता मुंबईत मोठ्या थाटामाटात हिंदू परंपरेनुसार आदर लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाआधीच्या समारंभाला सुरुवात झाली आहे. नुकताच मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या मेहंदी सोहळ्यामध्ये आलिया भट्ट चांगलीच भाव खाऊन गेली.

sachin pilgaonkar says he is not getting work
26 / 30

“मी अभिनय सोडला आहे, असं…”; सचिन पिळगांवकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले…

प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांनी गायन व दिग्दर्शनही केलं आहे. मात्र, सध्या त्यांना अभिनयासाठी विचारणा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात त्यांनी ही खंत मांडली. 'नवरा माझा नवसाचा ३' येण्याबाबत ते म्हणाले की, प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नशील असतील.

marathi actress neha shitole trolled for this post of chhatrapati shivaji maharaj jayanti 2025
27 / 30

“नचिकेत दुसरं लग्न करेल”, शिवजयंतीला लिहिलेल्या पोस्टवरून नेहा शितोळे ट्रोल, म्हणाली…

१९ फेब्रुवारीला संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली. यानिमित्ताने मराठी कलाकार मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात झळकलेल्या नेहा शितोळेने अनोख्या अंदाजात शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तिने पोस्टमधून स्वतःचं परखड मत मांडत शिवरायांकडे आधुनिक मावळ्यांना सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली. या पोस्टमुळे नेहा शितोळे सध्या चर्चेत आली असून तिला ट्रोल केलं जात आहे. एका नेटकऱ्याने तर तिला थेट शाप दिला आहे.

Konkona Sen Sharma was pregnant before marriage
28 / 30

लग्नाआधीच गरोदर होती अजय देवगणची ‘ही’ हिरोईन, पदरात मूल, १० वर्षांत मोडला संसार अन्…

बॉलीवूड February 20, 2025

सिनेविश्वात अफेअर, लग्न आणि घटस्फोट सामान्य गोष्टी आहेत. कोंकणा सेन शर्मा ही एक बॉलीवूड अभिनेत्री आहे जिने लग्नाआधीच गरोदर राहून बॉयफ्रेंड रणवीर शौरीशी २०१० मध्ये लग्न केले. त्यांना हारून नावाचा मुलगा आहे. मात्र, त्यांचे नाते २०१५ मध्ये तुटले आणि २०२० मध्ये घटस्फोट झाला. कोंकणाने अभिनयासोबत दिग्दर्शनातही यश मिळवले असून तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Chhaava Box Office Collection Day 6
29 / 30

Chhava: शिवजयंतीला ‘छावा’च्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ, सहाव्या दिवशी किती कमावले? वाचा…

बॉलीवूड February 20, 2025

१९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या उत्साहामुळे 'छावा' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारलेला हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. सहाव्या दिवशी चित्रपटाने ३२ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. एकूण सहा दिवसांत 'छावा'ने २०३.२८ कोटी रुपये कमावले आहेत. विकीने शिवजयंतीनिमित्त रायगडावर जाऊन महाराजांना अभिवादन केले.

New Zealand Players Scared During Pakistan Air Show in Champions Trophy Opener Match Video
30 / 30

VIDEO:“हा कसला एअर शो…” कराचीतील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात न्यूझीलंडचे खेळाडू घाबरले

क्रीडा February 20, 2025

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडकडून ६० धावांनी पराभव पत्करावा लागला. कराची नॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यापूर्वी भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्यात पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी एअर शो केला. अचानक सुरू झालेल्या या शोमुळे खेळाडू आणि चाहते दचकले. न्यूझीलंडने ३२० धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ २६० धावांवर सर्वबाद झाला.