Vegetables that Cure Diabetes मधुमेहावरचा उपचार आहेत ‘या’ भाज्या!
मधुमेहावर औषधाविना उपचार करण्यासाठी काही भाज्या उपयुक्त ठरतात. तांबडा भोपळा पचायला हलका असून, रसधातू वाढवतो. दुध्या भोपळा वजन कमी करण्यास मदत करतो आणि मधुमेहावर गुणकारी आहे. दोडका पथ्यकर असून, पोटदुखी, खोकला, कफ यावर उपयुक्त आहे. पडवळ मधुमेह, पित्तविकार, आणि कफ विकारांवर गुणकारी आहे. या भाज्यांचा नियमित आहारात समावेश केल्यास विविध विकारांवर उपचार होऊ शकतो.