आंबा खाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा! शरीरात उष्णतेचा अजिबात होणार नाही त्रास
Mango Eating Tips: उन्हाळ्याचे दिवस आणि रसाळ आंबा यांचे नाते खूप खास आहे. म्हणूनच बरेच लोक फक्त आंबे खाण्यासाठी उन्हाळ्याची वाट पाहतात. काही लोकांना आंबा इतका आवडतो की ते जेवतानादेखील आंबा खातात . पण काही काळानंतर, आंबा शरीरात उष्णता वाढवतो आणि यामुळे गरमी जाणवणे, पोटात जळजळ होणे किंवा तोंडात अल्सर होणे यासारख्या समस्या येऊ लागतात.