मायक्रोवेव्ह साफ करताना चुकूनही करु नका ‘या’ ५ चुका; नाहीतर होईल मोठे नुकसान
How To Clean Microwave: आजकाल प्रत्येक घरात मायक्रोवेव्हचा वापर केला जात आहे. त्याच्या मदतीने आपली अनेक कामे सोपी झाली आहेत. आता आपल्याला पिझ्झा, बर्गर, कुकीज इत्यादी गोष्टी खाण्यासाठी बाहेर जावे लागत नाही. याशिवाय, आज घरांमध्ये अन्न गरम करण्यासाठी, चहा करण्यासाठी आणि पापड, बटाटे, रताळे इत्यादी भाजण्यासाठीदेखील याचा वापर केला जात आहे. अशा परिस्थितीत जर ते मायक्रोवेव्ह जास्त काळ वापरले तर ते अन्नपदार्थांच्या वासाने भरून जाते आणि त्यावर काही पडले तर ते घाणेरडेदेखील होते.