मिक्सरमध्ये चुकूनही वाटू नका ‘हे’ पाच पदार्थ, अन्यथा आतील ब्लेड होईल खराब
मिक्सर ग्राइंडर ही प्रत्येकाच्या स्वयंपाकघरातील एक महत्वाची वस्तू आहे. यामुळे कमी वेळात झटपट स्वयंपाक करता येतो. कारण मिक्सरच्या मदतीने काही मिनिटांत तुम्ही हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, कांदा यांची पेस्ट बनवू शकता. परंतु, मिक्सरच्या भांड्यात कोणताही पदार्थ बारीक करताना काही गोष्टींची काळजी घेणे फार गरजेचे असते. कारण मिक्सरची मोटर आणि ब्लेड खराब होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला मिक्सर बराच काळ व्यवस्थित वापरण्यायोग्य ठेवायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे.