पोळी शिळी झालीय मग फेकून देताय? ‘हे’ आरोग्यदायी फायदे पाहून व्हाल अवाक
भारतात घरोघरी दररोज आवर्जून बनविला जाणारा पदार्थ म्हणजे पोळी. भारतात ठिकठिकाणी पोळीला वेगवेगळी नावं आहेत. पोळीला चपाती किंवा रोटी, असंही म्हटलं जातं. कोणत्याही भाजीसह किंवा अनेकदा डाळीबरोबरही लोक पोळी अगदी आवडीनं खातात. मात्र, आदल्या रात्री फ्रिजमध्ये ठेवलेल्या शिळ्या पोळ्या अनेकदा खाव्या लागतात. अन्नाची नासाडी रोखण्यासाठी तुम्ही हे करीत असाल; पण तज्ज्ञांच्या मते- शिळ्या पोळ्या ताज्या पोळ्यांपेक्षाही चांगल्या असतात.