मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा
Marathi Bhasha Gaurav Din 2025 Wishes : महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या आपल्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन. २७ फेब्रुवारीला महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठीतील आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन करण्याची परंपरा आहे. कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेची अस्मिता टिकवण्यासाठी तिच्या सन्मासाठी आयुष्यभर अथक प्रयत्न केले. यानिमित्ताने तुम्ही मराठी भाषेच्या अभिमान बाळगणाऱ्या नातेवाईक, मित्र परिवारास खास मराठमोठ्या शुभेच्छा पाठवू शकता.