“आम्हाला मूल नको होतं; पण…”, बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला मोठा खुलासा!
आपल्या प्रभावशाली अभिनयासाठी प्रसिद्ध असणाऱ्या राधिका आपटे हिने अलीकडेच मातृत्वाच्या प्रवासाबद्दलचे आपले अनुभव शेअर केले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितले की, जेव्हा तिला कळलं की, ती गरोदर आहे, तेव्हाचा तो क्षण खूपच अद्भुत होता.
‘वोग इंडिया’च्या मुलाखतीत ती म्हणाली, “ही खूपच हास्यास्पद गोष्ट आहे. मी नेमकं काय झालं ते सगळ्यांना सांगू इच्छित नाही. पण, फक्त एवढंच सांगेन की, हा एक अपघात नव्हता; पण आम्ही या प्रेग्नन्सीसाठी प्रयत्नदेखील करत नव्हतो आणि तरीही ही बातमी एक धक्का म्हणून आमच्यासमोर आली”