घरकामासाठी मोलकरीण ठेवण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी!
गेल्या काही वर्षांत मोठ-मोठ्या शहरांमध्ये घरकामासाठी मदतनीस ठेवण्याची संख्या झपाट्याने वाढतेय. विशेषत: ज्या घरांमध्ये पती पत्नी दोघेही ऑफिसला जात असतील अशा घरांत घरकाम, स्वयंपाक कामासाठी मदतनीस ठेवली जाते. जी सकाळच्या डब्यापासून ते घरातील कपडे, भांडी घासण्यापर्यंत सर्व कामं करते. लोक या मदतनीसेवर दिवसभर सर्व घर, मुलांची जबाबदारी सोपवून निवांतपणे कामावर जातात. पण, घरात मदतनीस ठेवण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे आणि सावध राहणे गरजेचे आहे.