Video : गुढीपाडव्याला फक्त दहा मिनिटात असे बनवा आंब्याच्या पानांचे सुंदर तोरण
पण सध्या सोशल मीडियावर गुढीपाडव्यानिमित्त अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. असाच एका व्हिडीओमध्ये आकर्षक व सोपी असे आंब्याच्या पानांचे तोरण कसे बनवायचे, याविषयी सांगितले आहे.
पण सध्या सोशल मीडियावर गुढीपाडव्यानिमित्त अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. असाच एका व्हिडीओमध्ये आकर्षक व सोपी असे आंब्याच्या पानांचे तोरण कसे बनवायचे, याविषयी सांगितले आहे.
शनिवार (२९ मार्च) आणि रविवार (३० मार्च) दोन दिवस ट्रेडिंग बंद राहिल्यानंतर, सोमवारी ३१ मार्च रोजीही BSE आणि NSE बंद राहणार आहेत. ईद उल फित्र २०२५ च्या पार्श्वभूमीवर बाजार बंद ठेवण्यात आला आहे. मंगळवार १ एप्रिल रोजी हे दोन्ही स्टॉक एक्स्चेंज सुरू होतील. एप्रिल महिन्यातील सुट्ट्या: १० एप्रिल - महावीर जयंती, १४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १८ एप्रिल - गुड फ्रायडे.
सलमान खान व रश्मिका मंदाना अभिनीत ‘सिकंदर’ चित्रपट ३० मार्चपासून सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. ए.आर.मुरुगादॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद पाहायला मिळाला नाही. सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सलमानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाचं कोणी भरभरून कौतुक करत आहे, तर कोणी ट्रोल करत आहे. सलमान, रश्मिकाच्या अभिनयासह कथानक अनेकांच्या पसंतीस उतरलं नाही. पण, ‘सिकंदर’ चित्रपटाने पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केली? जाणून घ्या.
गेल्या काही दिवसांत बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांमुळे अनेक अपघात घडले आहेत. नोएडामध्ये लाल रंगाच्या लँम्बोर्गिनी कारने दोन मजुरांना उडवलं. चालकानं "मी तर हळूच एक्सलरेटर दाबला होता, कुणी मेलं का?" असा प्रश्न केला. पोलिसांनी चालक दीपकला अटक केली आहे. अपघातात जखमी मजूर छत्तीसगडचे रहिवासी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर गुढीपाडवा मेळाव्यात भाषण केले. त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर भाष्य केले आणि देवेंद्र फडणवीस यांना सशर्त पाठिंबा जाहीर केला. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत राज ठाकरे काय म्हणाले? जाणून घ्या.
राज ठाकरेंनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख करत बीडमधील गुंडगिरीवर टीका केली. राज ठाकरेंनी जातीपातीच्या राजकारणावरही भाष्य केलं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी राजकीय पक्षांवर लोकांना जातीपातीत अडकवण्याचा आरोप केला आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर लक्ष देण्याचं आवाहन केलं.
बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘सिकंदर’ चित्रपट आज, ३० मार्चला प्रदर्शित झाला आहे. सलमान खानच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान खान पहिल्यांदाच दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानासह झळकला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रश्मिका मंदाना कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडाबरोबर पाहायला मिळाली. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उन्हाळ्यात स्वयंपाकघरापासून प्रत्येक कानाकोपऱ्यात लाल मुंग्यांची रांग लागलेली पाहायला मिळते. किचनच्या ओट्यावर ठेवलेल्या ब्रेज, भातापासून ते किचन ट्रॉलीमधील बिस्कीटच्या डब्यांपर्यंत सगळीकडे ही रांग पसरलेली दिसते. यावेळी विविध उपाय करून या मुंग्यांना पळवलं जातं. पण, काही दिवसांनी पुन्हा त्या सगळीकडे घर करताना दिसतात. घरातील बेडपासून कपड्यांचे कपाट, गादी, उशांवरही राहून त्या त्रास देण्यास सुरुवात करतात. पण, तुम्ही खालील काही सोपे उपाय करून घरातील मुंग्यांना न मारता सहजपणे पळवून लावू शकता.
अभिनेता विजय वर्मा गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. विजयचा तमन्ना भाटियाशी ब्रेकअप झाल्याची चर्चा होत आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरील विजयबरोबरचे फोटो डिलीट केल्यापासून दोघांमध्ये बिनसलं असल्याचं म्हटलं जात आहे. पण, काही दिवसांआधी विजय व तमन्ना एकाच ठिकाणी धुलीवंदन साजरी करताना दिसले. रवीना टंडनच्या घरी धूळवड खेळतानाचे विजय व तमन्नाचे फोटो व्हायरल झाले होते. अशातच विजय वर्माने रिलेशनशिपसंबंधित केलेलं वक्तव्य सध्या खूप चर्चेत आलं आहे. अभिनेत्याने रिलेशनशिपची तुलना आइस्क्रीमशी केली आहे.
संजय राऊत यांनी महायुती सरकारवर शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनांवरून टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत नकारात्मक वक्तव्य केल्याने राऊत यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, एकनाथ शिंदेंना शेतकऱ्यांसाठी उपोषण करण्याचा सल्ला दिला आहे. राज ठाकरेंच्या मेळाव्याबाबत राऊत यांनी भाजपशी असलेल्या त्यांच्या संबंधांवर टीका केली आणि मराठी माणसाला कमजोर करणारी भूमिका न घेण्याचे आवाहन केले.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध ठिकाणी उत्साह दिसून येतो आहे. गिरगावच्या शोभायात्रेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ढोलवादन केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. २०१९ आणि २०२४ मध्ये वरळी मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. जून २०२२ नंतर ते आक्रमक झाले होते, त्यांनी राज्याचा दौराही शिवसेनेतल्या फुटीनंतर केला होता.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानावर सभा आहे. या सभेत ते हिंदुत्व, औरंगजेबाची कबर, महाराष्ट्रातील राजकारण, महापुरुषांचा अवमान, मराठी-इतर भाषिक वाद यावर भाष्य करू शकतात. कामचुकार पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी आणि महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाची घोषणा यावरही ते बोलू शकतात. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देणार का, हेही महत्त्वाचं आहे.
हिंदी टेलिव्हिजनवरील सध्याचा लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘लाफ्टर शेफ.’ ज्याप्रमाणे ‘लाफ्टर शेफ’च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला, तसंच आता दुसऱ्या सीझनवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. ‘लाफ्टर शेफ’च्या पहिल्या सीझनपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे सुदेश लहरी यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. ही आनंदाची बातमी सुदेश लहरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
अखेर सलमान खानचा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘सिकंदर’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या धमाकेदार टीझर, ट्रेलर आणि गाण्यांनंतर आजपासून ‘सिकंदर’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. “ब्लॉकबस्टर चित्रपट”, “परफेक्ट ईद गिफ्ट”, “‘सुलतान’पेक्षाही ‘सिकंदर’ भारी आहे…खूप चांगला संदेश दिला आहे”, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया ‘सिकंदर’ चित्रपटाबाबत सोशल मीडियावर उमटल्या आहेत. दुसऱ्या बाजूला भाईजानच्या जबरा फॅनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो. याच सणापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. या सणाच्या निमित्ताने घरोघरी उंचच उंच गुढी उभारून नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. याच दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. या वर्षी गुढीपाडव्याचा सण ३० मार्च २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. दाराबाहेर सुंदर फुलांचे तोरण, रांगोळी काढली जाते. त्यामुळे सर्वत्र चैतन्यमय, उत्साही वातावरण पाहायला मिळते. यंदा या सणानिमित्त तुम्ही नातेवाईक, प्रियजन आणि मित्र परिवाला शुभेच्छा पाठवून त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत करू शकता.
दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील व राज बब्बर यांच्या प्रेमकहाणीबद्दल नेहमीच चर्चा होते. राज व स्मिता यांचा मुलगा प्रतीकने वडिलांचं नाव हटवून स्वतःचं नाव प्रतीक स्मिता पाटील असं केलं आहे. राज बब्बर यांच्या पहिल्या पत्नी नादिरा यांनी स्मिता पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला भेट दिली होती. नादिरा यांनी सर्वांना माफ केलं असून प्रतीकबद्दल चांगलं मत व्यक्त केलं आहे.
२०१० मध्ये ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी श्रद्धा कपूर आता प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. शक्ति कपूर आणि शिवांगी कोल्हापुरी यांची ही लाडकी लेक आता बॉलीवूडची आघाडी अभिनेत्री आहे. सतत सुपरहिट चित्रपट देताना दिसत आहे. गेल्यावर्षी श्रद्धाचा ‘स्त्री २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. अशा या बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीला गाड्यांची खूप आवड आहे. त्यामुळे आता श्रद्धाने आणखी एक नवी आलिशान गाडी खरेदी केली आहे.
बॉलीवूडमध्ये सध्या बरेच जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचं सत्र सुरू आहे. पण, यामधील मोजक्याचं चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. ‘सनम तेरी कसम’, ‘रॉकस्टार’, ‘रहना है तेरे दिल में’ अशा काही चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली. बॉलीवूडमध्ये सुरू असलेल्या सध्याच्या याच ट्रेंडविषयी बोलताना अभिनेता रणदीप हुड्डाने आपलं परखड मत व्यक्त केलं.
अभिनेता सलमान खानने भगव्या रंगाचं रामजन्मभूमीचं घड्याळ परिधान करुन फोटो पोस्ट केले आहेत. सलमानचं हे घड्याळ जेकब अँड कंपनीने तयार केले असून त्याची किंमत ३४ लाख रुपये आहे. सलमानच्या 'सिकंदर' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हे घड्याळ चर्चेत आलं आहे. या घड्याळावर रामजन्मभूमी, प्रभू राम आणि हनुमानाचं चित्र कोरलेलं आहे.
अभिनेता सलमान खानचा "सिकंदर" चित्रपट रमजान ईदला प्रदर्शित होतो आहे. प्रमोशनदरम्यान सलमानने राम मंदिराचं चित्र असलेलं ३४ लाख रुपयांचं घड्याळ घालून फोटो पोस्ट केले. यामुळे मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सलमानला शरियतचा सन्मान करून माफी मागण्याचा सल्ला दिला आहे.
डॉ. शशांक सामक आणि डॉ. जेसिका सामक यांनी प्रेम आणि विवाह यावर चर्चा केली आहे. युधिष्ठिराच्या उत्तरानुसार पत्नी ही पतीची उत्तम मित्र असते. प्रेम आणि विवाह टिकवण्यासाठी वास्तववाद आणि आदर्शवाद यांचा समतोल आवश्यक आहे. प्रेमाची कला आणि शास्त्र समजून घेतल्यास दाम्पत्यांचे नाते दृढ होईल. त्यांनी तीन सूत्रे दिली आहेत: जागरूकता, भूतकाळावर पडदा टाका, आणि सकारात्मकता.
इंडियन एक्स्प्रेसने २०२५ साठी भारतातील १०० प्रभावी व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यात नरेंद्र मोदी, गौतम अदाणी यांच्यासह महाराष्ट्रातील सात व्यक्तींची नावे आहेत: मोहन भागवत, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, पियूष गोयल, अजित पवार, आणि शरद पवार. विशेष म्हणजे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नावे या यादीत नाहीत. यादीत अमिताभ बच्चन, आलिया भट्ट, करण जोहर, शाहरुख खान यांच्यासारख्या सेलिब्रिटींचीही नावे आहेत.
अभिनेत्री नेहा शितोळेने अनेक मराठी मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केल्यानंतर आता लेखिका म्हणून पदार्पण केले आहे. तिने 'देवमाणूस' चित्रपटासाठी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या भूमिका आहेत. सई ताम्हणकर पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे. 'देवमाणूस' २५ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने वृद्ध नागरिक कायदा २००७ अंतर्गत एका वृद्ध महिलेनं मुलाला घराबाहेर काढण्याची याचिका फेटाळली. न्यायालयाने नमूद केलं की, कायद्यात मुलांना घराबाहेर काढण्याची तरतूद नाही. अपवादात्मक स्थितीतच असे आदेश दिले जाऊ शकतात. न्यायालयाने कौटुंबिक कलहाबद्दल चिंता व्यक्त केली आणि 'वसुधैव कुटुंबक' तत्वावर विश्वास ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
बॉलीवूड आणि टीव्ही अभिनेत्री तनाज इराणीने आपल्या अभिनयाने छाप उमटवली आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले. तनाजने १९९२ मध्ये फरीद कुरीमशी आंतरधर्मीय लग्न केले, परंतु वयातील फरकामुळे ८ वर्षांनी घटस्फोट झाला. २००६ मध्ये 'फेम गुरुकूल'च्या सेटवर बख्तियार इराणीशी भेट झाली आणि २००७ मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना दोन अपत्ये आहेत आणि ते आनंदी आहेत.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लील शिवीगाळ करून धमकावणाऱ्या तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. कोल्हापूर सेशन कोर्टात सुनावणीदरम्यान वकील असिम सरोदे यांनी कोरटकरला अटकेपासून संरक्षणाचा आदेश रद्द झाल्याचे सांगितले. कोरटकर फरार होता आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी त्याला मदत केली होती. पोलिसांनी त्याच्या सहा ठिकाणांच्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज असल्याचेही सरोदे यांनी नमूद केले.
सलमान खानचा बहुचर्चित 'सिकंदर' चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. ३० मार्चला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी 'सिकंदर' सज्ज झाला आहे. भाईजानच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. दोन वर्षांनंतर सलमान खानचा 'सिकंदर' चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. त्यामुळे सध्या 'सिकंदर'ची क्रेझ दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, हा चित्रपट 'शोले' लेखक व सलमान खानचे वडील सलीम खान यांना कसा वाटला? घ्या जाणून…
दिल्लीतील नॉलेज पार्क जे ब्लॉक परिसरातील अन्नपूर्णा गर्ल्स हॉस्टेलमध्ये २७ मार्च रोजी सायंकाळी भीषण आग लागली. एअर कंडिशनर कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीमुळे विद्यार्थिनी घाबरल्या आणि काहींनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उड्या मारल्या. अग्निशमन दलाने सर्व विद्यार्थिनींना सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु गोंधळ आणि आरडाओरडा झाला.
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनंतर सुनीता पहिल्यांदाच एका कार्यक्रमात दिसली. पापाराझींनी गोविंदाबद्दल विचारल्यावर तिने "आम्हीही त्यांनाच शोधत आहोत" असं उत्तर दिलं. सुनीताच्या प्रतिक्रियांमुळे चाहत्यांनी टीका केली. गोविंदाच्या वकिलाने स्पष्ट केलं की, सुनीताने घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला असून, दोघेही एकत्र आहेत आणि त्यांच्यात सर्व काही ठीक आहे.
दिल्ली विधानसभेत भाजपा आमदार मोहन सिंह बिष्ट मुस्तफाबादचं नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवणार आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की, १९९८ ते २००८ दरम्यान या क्षेत्राचं नाव करावल नगर होतं. मुस्तफाबादमध्ये ४० टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. बिष्ट यांनी निवडणूक प्रचारावेळी नाव बदलण्याचं वचन दिलं होतं. त्यांनी मंदिर परिसरातील मटणाची दुकाने बंद ठेवण्याची मागणी केली आहे.