“काँग्रेस असो वा भाजपा…”, मुंबईच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा थेट काँग्रेसला इशारा
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळत असून कर्नाटकातील आमदार लक्ष्मण सवदी यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या विधानामुळे महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी या मागणीचा निषेध करत काँग्रेसला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा शिवसेना सहन करणार नाही. मुंबई ही मराठी माणसाची मायभूमी आहे.