आदित्य ठाकरेंचा अंगुलीनिर्देश कुणाकडे? “नागपूर दंगलीमागे सरकारमधलेच काही घटक….”
१७ मार्चला नागपूरमध्ये दोन गटांमध्ये दंगल झाली. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी हिंदू संघटनांनी प्रतीकात्मक पुतळा जाळला, ज्यामुळे संघर्ष उफाळला. या घटनेत पोलीस जखमी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत निवेदन दिलं. आदित्य ठाकरेंनी या दंगलीमागे सरकारमधील काही घटकांचा हात आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जावं असंही सुचवलं आहे.