स्टॅम्प पेपर शुल्कवाढीनंतर आता दस्त हाताळणी दर दुप्पट वाढले; वाचा काय सांगतो शासन निर्णय!
महाराष्ट्र सरकारने स्टॅम्प पेपर शुल्कात वाढ केल्यानंतर आता दस्त हाताळणी शुल्कातही दुप्पट वाढ केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयावर टीका केली आहे. त्यांनी सरकारवर सामान्य जनतेच्या खिशातून पैसा काढून दलालांचे खिसे भरण्याचा आरोप केला आहे. पवार यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्न उपस्थित करत भ्रष्टाचार थांबवण्याची मागणी केली आहे.