पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा जोरात आहे. दिल्ली आणि मुंबईत अनेक बैठका झाल्या. अजित पवारांनी शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली. माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी दोन दिवसांनी शपथविधी होणार असल्याचं सांगितलं. १४ तारखेला भाजपचे २०, शिंदे गटाचे १३ आणि अजित पवारांचे १० आमदार शपथ घेणार असल्याची चर्चा आहे.