दिल्लीत अजित पवार-शरद पवार भेट; युगेंद्र पवार म्हणतात, “एकत्र येण्यासाठी प्रयत्न…”
गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार व शरद पवार दुरावले. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी बाजी मारली. निकालांनंतर पहिल्यांदाच दोघांची भेट झाली. युगेंद्र पवारांनी या भेटीला कौटुंबिक म्हटलं, पण कार्यकर्त्यांना दोघांनी पुन्हा एकत्र यावं अशी अपेक्षा आहे. शरद पवारांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत ही भेट झाली.