“कोणत्यातरी एकाच योजनेचा लाभ घ्या”, आठ लाख लाडक्या बहिणींबाबत पवारांनी स्पष्ट केली भूमिका!
राज्यातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. विरोधकांचा दावा आहे की नमो शेतकरी योजनेतील पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेतून फक्त ५०० रुपये मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, योजनेसाठी आवश्यक निधी तरतूद केलेली आहे आणि योजना बंद होणार नाही. त्यांनी नमो आणि लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना एकाच योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.