पार्थदादा जय पवारांपेक्षाही मोठे, त्यांचं लग्न कधी? अजित पवारांचं मिश्किल उत्तर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा पुत्र जय पवार यांचा साखरपुडा ऋतुजा पाटील यांच्याशी थाटामाटात संपन्न झाला. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. पार्थ पवारांच्या लग्नाबद्दल विचारले असता अजित पवारांनी मिश्किल उत्तर दिले. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पवार कुटुंबातील एकत्रित फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत.