अमित शाह यांचं विधान, “माझी हात जोडून विनंती आहे, छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापुरतं…”
किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे होते. त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याचे कौतुक केले. शाह यांनी राजमाता जिजाऊंच्या योगदानाचेही स्मरण केले. त्यांनी महाराष्ट्रातील लोकांना शिवरायांना फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवण्याचे आवाहन केले. लोकमान्य टिळकांच्या स्मारक कार्याचेही त्यांनी कौतुक केले.