शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार, संजय राऊतांची टीका, अमोल कोल्हेंचं उत्तर
दिल्लीतील साहित्य संमेलनात शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली. त्यांनी शिंदेंऐवजी अमित शाह यांचा सत्कार केला असल्याची टीका केली. याला उत्तर देताना खासदार अमोल कोल्हेंनी शरद पवारांच्या स्टेटमनशिपचे कौतुक केले आणि राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.