“धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्या”, अंजली दमानियांनी जोडला आणखी एक पुरावा
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचं नाव समोर आल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतेय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात अधिक लक्ष घालून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला आहे. त्यांनी वेंकटरश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस कंपनीचे पुरावे शेअर केले असून, मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे अधिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.