मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसमध्ये ATM, आता धावत्या ट्रेनमध्ये पैसे काढण्याची सुविधा!
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी धावत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नाशिक-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसमध्ये बसवलेल्या या एटीएममुळे प्रवाशांना रोख रक्कम काढणे सोपे झाले आहे. भुसावळ रेल्वे विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत ही सुविधा देण्यात आली आहे. चाचणी यशस्वी ठरल्याने भविष्यात इतर रेल्वेगाड्यांमध्येही ही सुविधा देण्याचा विचार आहे.