सिद्दीकी हत्याप्रकरणात मोठी अपडेट; हल्लेखोर ‘या’ ॲपवरून करत संभाषण
राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गटाने हत्या कट रचला होता. आरोपींच्या मोबाईलमध्ये झिशान सिद्दीकी यांचा फोटो सापडला आहे. आरोपींनी स्नॅपचॅटद्वारे माहिती शेअर केली होती. सुरक्षा रक्षक श्याम सोनवणे निलंबित करण्यात आले आहेत. डोंबिवलीतील नितीन सप्रे टोळीचा सहभाग उघड झाला असून, त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे.