बाबा सिद्दीकी यांच्या हल्लेखोरांची लॉरेन्स बिश्नोईच्या सदस्यांशी कुठे झाली होती भेट?
राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांना २१ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. आरोपींनी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्याची हरियाणातील तुरुंगात भेट घेतली होती. शिवकुमार गौतम आणि मोहम्मद झीशान अख्तर हे संशयित आरोपी आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने इतर कोणाचा खून करण्याचा कट होता का हे तपासले जात आहे.