सरपंच हत्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद, आमदार संदीप क्षीरसागर यांचं उद्विग्न भाषण…
गेल्या काही दिवसांपासून बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा चर्चेत आहे. या हत्येच्या तपशीलांमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात चर्चेची मागणी करत सभात्याग केला. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी केली. त्यांनी बीडमध्ये खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार आणि जातीय राजकारणावरही टीका केली.