“महाराष्ट्र हे प्रचंड जातीयवादी राज्य, पुरोगामी वगैरे थोतांड”, भाजपा आमदाराचं विधान चर्चेत
भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्रातील जातीयवादावर भाष्य करताना राज्य पुरोगामी असल्याचे दावे थोतांड असल्याचे म्हटले आहे. त्यांनी महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर चालतो हे फक्त भाषणापुरते असल्याचे सांगितले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्यावर टीका करताना सरकारच्या विरोधात लढण्याची हिंमत नसल्याचे विधान केले.