आग्र्यात छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक उभं राहणार, शासन आदेश जारी
महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा येथे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली. या स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून शासन आदेश जारी झाला आहे. पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची समिती स्थापन होणार आहे. शिवरायांच्या पराक्रमाची गौरवगाथा पुढील पिढ्यांसाठी जपण्यासाठी हे स्मारक उभारले जाणार आहे.