“तो पुतळा उभारणारा कंत्राटदार ठाण्याचा”, सुप्रिया सुळेंच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांचं उत्तर
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. हा पुतळा उभारणारा कंत्राटदार ठाण्याचा होता असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी त्यांच्या आरोपांना उत्तर देणार नाही. मी एवढंच सांगेन की तो पुतळा नौदलाने उभारला होता व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तो पुतळा कोसळला.