“तहव्वूर राणाला कसाबप्रमाणे बिर्याणी देऊ नका, त्याला…”; ‘छोटू चहावाल्या’ची मागणी
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हिरवा सिग्नल दिल्यानंतर भारतीय पथक अमेरिकेत दाखल झाले आहे. मोहम्मद तौफीक उर्फ छोटू चहावाल्याने राणाला अजमल कसाबसारखी सेवा न देण्याची विनंती केली आहे. त्याने दहशतवाद्यांसाठी कठोर कायदा बनवून त्यांना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी केली आहे.