मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिरेटोप घालण्यास दिला नकार; कृतीने वेधलं लक्ष!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा जिरेटोप परिधान करण्यास नकार देऊन शिवभक्तांची मने जिंकली आहेत. आळंदीतील संत संवाद कार्यक्रमात त्यांचा शाल आणि मोराच्या पिसांचा हार घालून सन्मान करण्यात आला, परंतु जिरेटोप डोक्यावर परिधान करण्यास त्यांनी नकार दिला. फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून शिवछत्रपतींचा मान राखला आहे. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.