“वो आये मेरी मजार पर…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शायराना अंदाज
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे विविध कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात पालकमंत्री पंकज भोयर, खासदार अमर काळे, आमदार सुमित वानखेडे यांच्यासह भाजपाचे दिग्गज उपस्थित होते. सुमित वानखेडे यांनी शायरीतून मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले, तर फडणवीस यांनीही शायरीतून उत्तर दिले. फडणवीस यांनी विकासकामांबद्दल आश्वासन दिले आणि सुमित वानखेडे यांच्या तळमळीचे कौतुक केले.