“आज माझ्या नणंदा…” अमृता फडणवीसांनी हळदीकुंकूच्या कार्यक्रमात घेतला झक्कास उखाणा!
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुण्यातील भाजपाचे माजी नगरसेवक किरण दगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महिला मेळाव्यात उपस्थिती लावली. त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत झक्कास उखाणा घेतला. अमृता फडणवीस महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणपूरक कार्यक्रमांत सक्रिय असतात. लाडकी बहीण योजनेचा प्रचार करत त्यांनी महिलांचं मन जिंकलं.