छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना राहुल गांधींकडून चूक
संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती साजरी होत असताना, राहुल गांधी यांच्या पोस्टमुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी जयंतीनिमित्त श्रद्धांजली असा शब्द वापरल्याने भाजपाने टीका केली आहे. भाजपाचे नेते नितेश राणे आणि आमदार अतुल भातखळकर यांनी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.