“…पण ते पुन्हा आले”, एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!
राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं आहे. ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अभिनंदन प्रस्ताव सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना कोपरखळी मारत अभिनंदन केलं आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं.