देवेंद्र फडणवीसांना हवंय ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका!
विधानसभा निवडणूक निकालांनंतर मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्रीपद, मंत्रीपद वाटप आणि खातेवाटप या गोष्टी चर्चेत राहिल्या. आता पालकमंत्रीपदांबाबत चर्चा सुरू आहे. नाराज आमदारांना पालकमंत्रीपद देण्याचा विचार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वत:कडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील असं सांगितलं. महायुतीच्या सत्ताकाळाला त्यांनी क्रिकेट सामन्यांची उपमा दिली.