दादरमधील हनुमान मंदिराबाबत राज्य सरकारची नेमकी भूमिका काय? फडणवीसांनी केलं स्पष्ट!
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईच्या राजकीय वर्तुळात दादरमधील हनुमान मंदिराचा मुद्दा चर्चेत आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर टीका केली. भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांनी मंदिर हटवण्याची नोटीस स्थगित केल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंदिर नियमितीकरणाबाबत सविस्तर भूमिका मांडली आणि नियमांनुसार मंदिराचं नियमितीकरण होणार असल्याचं स्पष्ट केलं.