“काँग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाचं राजकारण, भारतरत्नही…”, मुख्यमंत्र्यांची टीका!
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि दलित असल्याने हत्या झाल्याचा दावा केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी संसदेचा आणि जनतेचा वेळ वाया घालवत आहेत. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना कधीच योग्य सन्मान दिला नाही, तर भाजपाने त्यांच्या स्मृती जपल्या आहेत.