‘सरकारमध्ये काही तडजोडी कराव्या लागतील’, सत्तास्थापनेआधी देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आभार प्रदर्शनाच्या भाषणात फडणवीस यांनी विजयाचे श्रेय भाजपाच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले. त्यांनी सांगितले की, सरकार स्थापन केल्यानंतर काही गोष्टींचा त्याग करावा लागेल आणि सर्वांना एकत्र घेऊन काम करावे लागेल.