Video: दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षांमुळे क्रमांक एकची अडचण? राज्यात नेमकं घडतंय काय?
'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करताना, सत्ताधारी महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता असल्याचे नमूद केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे १०० दिवस पूर्ण होत असताना, सत्तेत असूनही तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद दिसत आहे. आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर, तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन राज्याच्या विकासासाठी धोरणांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे कुबेर यांनी म्हटले आहे.