पालिका निवडणुकीत राज ठाकरेंना महायुतीत घेणार का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले. मुंबईत महायुती एकत्रच लढणार आहे. राज ठाकरेंच्या मनसेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. राजकीय परिस्थितीवर अवलंबून निर्णय घेतला जाईल. महायुतीत चौथा पक्ष सामावून घेण्याबाबतही विचार केला जाईल, असे फडणवीसांनी सांगितले.