दिशा सालियन प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले देवेंद्र फडणवीस; सरकारची भूमिका मांडताना म्हणाले…
गेल्या चार दिवसांपासून दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हत्या झाल्याचा दावा करत याचिका दाखल केली आहे. आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत न्यायालयाच्या निर्णयावर पुढील कारवाई ठरेल असे सांगितले.